बंद

    दृष्टी आणि ध्येय

        १.  दृष्टी

    • शासनाच्या आर्थिक संसाधनांचा कार्यक्षम, पारदर्शक व परिणामकारक वापर करणे.
    • शासकीय निधीचा योग्य व नियमानुसार विनियोग सुनिश्चित करणे.
    • आर्थिक शिस्त व वित्तीय उत्तरदायित्व वाढविणे.
    • अर्थसंकल्पीय नियोजन अधिक सक्षम व परिणामाभिमुख करणे.
    • वित्तीय कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे.
    • आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे.
    • अनावश्यक खर्च कमी करून सार्वजनिक निधीची बचत करणे.
    • वेळेत आर्थिक निर्णय व निधी वितरणास प्रोत्साहन देणे.
    • लेखा व लेखापरीक्षण प्रणाली अधिक सक्षम करणे.
    • सुशासन व विकासाभिमुख वित्तीय व्यवस्थापनाला चालना देणे. 
    •  २. ध्येय 

    • अर्थसंकल्पीय तरतुदींचे नियोजन, नियंत्रण व नियमित आढावा घेणे.
    • प्राप्त प्रस्तावांची छाननी करून नियमानुसार कार्यवाही करणे.
    • खर्चास मंजुरी देताना लागू असलेल्या आर्थिक नियमांचे पालन सुनिश्चित करणे.
    • निधी वितरण व खर्चाच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
    • प्रलंबित आर्थिक प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे.
    • वेतन, भत्ते, देयके व इतर आर्थिक बाबींची वेळेत कार्यवाही करणे.
    • लेखा नोंदी, विवरणपत्रे व वित्तीय अहवाल अचूक ठेवणे.
    • अंतर्गत लेखापरीक्षणातील त्रुटींचे निराकरण करणे.
    • ई-ऑफिस, डिजिटल स्वाक्षरी व संगणकीकृत प्रणालींचा वापर वाढविणे.
    • विविध विभागांमध्ये आर्थिक नियमांबाबत समन्वय व मार्गदर्शन करणे.
    • अनावश्यक खर्च व निधीच्या विनावापरित शिल्लक रकमेवर नियंत्रण ठेवणे.
    • कामकाजात कार्यक्षमता, अचूकता व वेळेचे नियोजन वाढविणे.