National Emblem of India
  1. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 (झ)(१) व 243(म) (१) अनुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या (ग्रामीण व नागरी) आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोग गठीत करण्याची तसेच राज्यपाल, आयोगाने या अनुच्छेदाअन्वये केलेली प्रत्येक शिफारस आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीसंबंधीचे एक स्पष्टीकरणात्मक ज्ञापन राज्याच्या विधानमंडळापुढे मांडण्याची व्यवस्था करील, अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र वित्त आयोग (संकीर्ण तरतूद) अधिनियम, 1994 मध्ये राज्यासाठी वित्त आयोग स्थापना व त्याच्या संरचनेची तरतूद केली आहे.
  2. उपरोक्त तरतुदींनुसार राज्याने एकूण पाच राज्य वित्त आयोगांची स्थापना केली आहे.वित्त विभाग,मंत्रालय यांनी आयोगांनी सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर स्पष्टीकरणात्मक ज्ञापन विधानमंडळासमोर त्या त्या वेळी मांडण्यात आले आहे.