National Emblem of India

शासन अधिसूचना, वित्त विभाग, दि.10.6.2016 अन्वये सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमांवर तसेच अंशदायी भविष्य निर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तिंच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर दि. 1 एप्रिल, 2016 ते 30 जून 2016 या कालावधीकरितादरसालदरशेकडा8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरील मुखपृष्ठावरील “कायदे / नियम” या शीर्षाखाली उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.”